Thursday, May 15, 2025

(२) 'पाणी हेच जीवन !' या विधानासंबंधी तुमचे विचार लिहा.

 

(२) 'पाणी हेच जीवन !' या विधानासंबंधी तुमचे विचार लिहा.


पाणी हे पृथ्वीवरचे अमृत आहे. ते सर्व सृष्टीचे संजीवन आहे. पृथ्वीवरील सजीव-निर्जीव सृष्टीला पाण्याची अत्यंत आवश्यकता असते. पाण्याशिवाय पशु-पक्षी, प्राणी व मानवी जीवन कोमेजून जाईल. निसर्ग हिरवागार करण्याची किमया पाण्यामध्ये आहे. पाण्यामुळे गाई-गुरांना हिरवा चारा मिळतो. तर पाण्यामुळे मानवाचे अन्नधान्य शेतात उगवते. जगातील प्रत्येक घटकाची तहान शमवण्याचे सामर्थ्य पाण्यातच असते. पाणी नसेल तर ही पृथ्वी भकास, ओसाड व वैराण होईल आणि पृथ्वीवरील जीवन नष्ट होईल. म्हणून 'पाणी हेच जीवन' हा मानवी इतिहासाचा मूलमंत्र आहे.


No comments:

Post a Comment

(२) 'पाणी हेच जीवन !' या विधानासंबंधी तुमचे विचार लिहा.

  (२) 'पाणी हेच जीवन !' या विधानासंबंधी तुमचे विचार लिहा. पाणी हे पृथ्वीवरचे अमृत आहे. ते सर्व सृष्टीचे संजीवन आहे. पृथ्वीवरील सजीव-...